Wednesday, August 17

कमाल आहे !

टेक्नोलॉजीची कमाल आहे !
पिझ्झा खाता खाता 
अण्णांच्या उपोषणाची 
रसभरीत बातमी चाखता येते !

कम्युनिकेशनची कमाल आहे !
एसेमेसेस् फॉरवर्ड करून 
आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला 
की स्वस्थपणा येतो !

पक्ष-प्रवक्त्यांची कमाल आहे !
पत्रकार परिषदेत दुसर्‍याला दोष दिला की
आपली पापं धुतल्याची 
मिजास चेहर्‍यावर चढते !

पत्रकारांची कमाल आहे !
रोज काही चमचमीत दिल्याखेरीज 
चमचमीत खायचं नाही 
असे त्यांच्या रक्तात दिसते !

मंत्र्यांची कमाल आहे !
विरोधकांचा शिखंडी करून 
जनतेला गोळी मारता येते !

जनतेचीही कमाल आहे !
एक अण्णा उपोषण करतो 
हे पाहून जनतेला
स्वस्थपणे जेवता येते !

No comments: