Tuesday, July 5

कण !

दुनियेला जगताना पाहातो
तेव्हढेच असते
स्वतःचे जगणे !
दुनिया हसरी दिसत राहाते
तेव्हढेच आणि
स्वतःचे हसणे !
डोळे मिटून पुन्हा उघडू शकतो
तोच आयुष्याचा क्षण !
श्वास घेताच
वेचला जातो
आयुष्याचा 
एकच कण !

1 comment:

rajendra chavan said...

जगण्याविषयी सांगण्यातच आपला किती वेळ जातो!
जगायचं राहून तर नाही ना जात?
पण मग सांगणं हेच जगणं वाटत असेल तर काय?
सांगण्या- ऐकण्यात आहेच काहीतरी...असो.
आतल्या आणि बाहेरच्या जगाच्या वेळेचा घोळ..
त्याचा मेळ जमायला हवा..