Thursday, June 16

जीवघेणं


काळ्या ढगाचं मन ...

साचलेल्या तळ्याचं मन …

वाराच नसलेल्या घुम्म हवेचं मन ….

नुसतेच ढग जमा होतात अन्

पाऊस पडत नाही अशा वांझ आभाळाचं मन …

असेच लाखो पावसाळे रोज उपसणारं मन …

माझ्या आत वाढतंय …

कॅन्सरच्या गुप्ततेनं, विस्तारानं आणि जीवघेणेपणानं !

No comments: