Tuesday, July 5

थेंब नाही ...

पावसाची वाट 
बघून बघून 
झेलताना ऊन
जातो प्राण ||

तहानले जीव
फिकटली पाने
केली आकाशाने
नाही कृपा ||

रखरख होई 
अंगांगाची लाही
भेटीलागी येई
तहानता ||

ढग येती जाती
वाहाती वारेही
दृष्टीला तरीही
वृष्टी नाही ||

भिजणे स्वप्नीही 
अशक्यचि आता
जीवनाची चिंता
पूर्ण ग्रासे ||

पाणी पाणी होई 
सुकल्या कंठाला
यायाला डोळ्याला 
थेंब नाही ||

आकाशीच्या बापा
लेकरे ही अशी
तहानेली अशी 
ठेविशी गा ||

थांबवावी आता
शुष्क परवड 
कोसळूनी पद
मेघ राजा || 




3 comments:

rajendra chavan said...

सगळ्यांच्या मनातलं..

aativas said...

हो, मलाही असच वाटत ..

harshal said...

wow dada its gr8 poem