Friday, June 3

तयारी !

दूरवरून थेट
माझ्या आकाशात
लोटत आणलेले
अजस्र कृष्णमेघ,  
त्यासाठी निर्मिलेले
बेफाम वारे,
माझी अवघी सृष्टीच
घुसळताना
असंख्य पाना-फांद्यांचे नृत्य,
आणि
नभाच्छादनात
दडवलेल्या
तालवाद्यांवर
हे विद्युल्लेखित
विलक्षण प्रीति-तांडव !
हे सर्व
आणि
असे सर्व काही ...
...  मी केवळ
एकवार
अनावर भिजण्याची
इच्छा करताच
तू
त्यासाठी केलेली
ही तयारी !
किती किती
आणि केव्हढी ?! 

No comments: