Wednesday, May 25

कवेत ...

तू
संवेदनेच्या
आडून ...
मग 
अचानक 
सामोरी येऊन ..
इथवरचा
माझा 
अवघा जन्म ..
आणि त्यासकट मी ..
स्वीकारून ..
त्या क्षणीच
सर्व काही कवेत घेणारी ..
माझी कविता !