Tuesday, July 27

पाऊस .. तुझाच सगळा !


हलक्या हलक्या पावलांचा पाऊस ..
तुझ्याच चाहुलींचा !
नुसता नुसता दाटलेला पाऊस ..
तुझ्याच आठवणींचा !

छमछम छमछम पैंजणांचा पाऊस ..
चमचम चमचम काजव्यांचा पाऊस ..
रात्र - रात्र सोबतीला पाऊस ..
तुझ्या स्वप्नांचा .. तुझ्याच स्वप्नांचा !

वार्‍याशी खेळणारा पाऊस ..
गारांना फेकणारा पाऊस ..
खळखळून धावणारा पाऊस ..
तुझ्या हसण्याचा .. तुझ्याच हसण्याचा !

निळे-निळे नाहणारा पाऊस ..
सप्तरंग पाहणारा पाऊस ..
हिरवाई नेसणारा पाऊस ..
तुझ्या साजाचा .. तुझ्याच सजण्याचा !

क्षितिजाच्या डोळ्यांचा पाऊस ..
मातीच्या वासाचा पाऊस ..
जगण्याच्या ध्यासाचा पाऊस ..
तुझ्या कवितेचा .. तुझ्याच गीतांचा !

अथकश्या सोबतीचा पाऊस ..
जगण्याच्या मैफलीचा पाऊस ..
जन्माच्या नात्यांचा पाऊस ..
तुझ्या असण्याचा .. तुझ्याच असण्याचा !

No comments: