Thursday, June 17

पाऊसगाणं - २

कोणाची हाक ऐकण्या - पाऊस येतो ?
कोणाला साद घालण्या - पाऊस येतो ?

ग्रीष्मी सुकल्या डोळ्यांचे...
मातीमधल्या बीजांचे ...
पानांमधल्या बहरांचे...
वेलींवरल्या इवल्यांचे...

कोणाचे स्वप्न झेलण्या - पाऊस येतो ?

गीतांमधल्या शब्दांशी ..
क्शितिजावरच्या रंगांशी ..
हृदयमधल्या तालाशी ..
जगण्यामधल्या आशेशी ...

कोणाशी गूज छेडण्या - पाऊस येतो ?

घनगर्द अश्या रानाचे ...
घमघम करत्या वार्‍याचे ...
आकाशीच्या तार्‍यांचे ...
स्वर्गांमधल्या देवांचे ...

कोणाचे दान पेरण्या - पाऊस येतो ?

No comments: