Tuesday, June 8

पाऊस आला !

वार्‍याला पावले थेंबांची घेऊन पाऊस आला !
आकाशी पांखरे ढगांची घेऊन पाऊस आला !

उजाडल्या डोळ्यांकाठी,
तहानल्या ओठांसाठी,
जगण्याचे थेंब चार ताजे घेऊन पाऊस आला !

आतुरश्या काळजांचे,
वाटेकडल्या नजरांचे,
क्षितिजाला रंग काजळाचे घेऊन पाऊस आला !

सरसरत्या लयतालांचे,
झिमझिमत्या झंकारांचे,
धरतीचे स्वप्न मैफलीचे घेऊन पाऊस आला !

हृदयातुन दाटलेला,
अश्रूंतून फाटलेला,
शब्दांना पूर एक वेडा घेऊन पाऊस आला !

No comments: