Wednesday, June 9

अता ..

वेगळा चंद्र हा कशास अता ?
चेहरा रोजला तुझाच अता !

हासुनी सारखे असे पहाणे ..
चोरणे अर्थ हे उगाच अता ?

भास हा की असे खरेच सारे ?
बोलती स्पर्शही झकास अता !

लोपते विश्व अन क्षणात सारे
पाहता तू असे डोळ्यात अता !

अंतरे - शून्यतेत गेलेली ...
दूर का जायचे जन्मात अता ?

No comments: