Tuesday, May 11

हा अबोला ... (मराठी गझल)

हा अबोला .. कधी तुटेल आता ?
हाय कोडे .. कधी सुटेल आता ?

सांगणारी मला तुझीच स्वप्ने ..
झोप माझी .. कधी उडेल आता ?

एकटा मी अजून संभ्रमात ..
खूण काही .. कधी पटेल आता ?

चांदण्यांचे तुझे अभाळ वेडे ..
एक तारा .. कधी तुटेल आता ?

सोहळे संपले अता सारे ..
दूर पक्षी .. कधी उडेल आता ?

3 comments:

Sagar Kokne said...

छान आहे

T.D. said...

ekdum chan. Serene....
"सांगणारी मला तुझीच स्वप्ने ..
झोप माझी .. कधी उडेल आता ?" khupach aawadali line.

मिलिंद / Milind said...

गझल आवडली.
सांगणारी मला तुझीच स्वप्ने ..
झोप माझी .. कधी उडेल आता ?

एकटा मी अजून संभ्रमात ..
खूण काही .. कधी पटेल आता ?


- मस्त.
सोहळे संपले अता सारे ..
ह्या ओळीत एक लघु मात्रा कमी पडते आहे. वृत्त
गा ल गा गा | ल गा ल गा ल गा गा |
आहे, त्यामुळे
'सोहळे संपलेत सर्व आता'
असा किरकोळ बदल केल्यास वृत्तदोष टाळता येईल.