Thursday, April 1

मागे ...

चित्रामागे चेहर्‍याच्या दु:खाचा चेहराच खरा !
बाहुलीमागे डोळ्यामध्ये भरलेला अंधार खरा !


येती-जाती चाहुल ही अन श्वासांच्या अनिवार खुणा ..
जगण्यासाठी अन स्वप्नांचा एक नवा हुंकार खरा !


नात्यांची सगळी माया अन भूलभुलैय्या गोतांचा
नजरेमागे त्यात कुणाच्या दडलेला विश्वास खरा !


जगणे धूसर, विरली काया, धुरकट मावळती क्षितिजे ..
अंगावरती जखमी पिसांचा उरलेला संभार खरा !


अंधाराचे भयाण नीरव, थिजलेल्या काळातच जीव
मिणमिणणार्‍या पणतीचा अन अस्फुटसा उदगार खरा !

1 comment:

rajendra chavan said...
This comment has been removed by the author.