तरी माझी डोळ्यातली टिपे मीच खुडायची कशाला?
डोळ्यातून आसवांचे माती-मोल पीक असे काढलेले ..
तहानेल्या मनासाठी आता व्यथा थंडाव्याची कशाला?
एक धागा या गाठीत, मी ही जसा, एक तू ही गुंतून ...
व्यर्थ वेडी आशा अशी एकट्याने सुटण्याची कशाला?
पाण्यातले बिम्ब ताजे पाणी जरी काळेशार झाकोळीचे
आरश्याच्या रूपावर बिम्बे सारी तोलायची कशाला?
पाहाण्याचे सोहळे दिसण्याच्या क्षितिजाही पल्याड ..
जाणीवेच्या स्पर्शांतून कुणी असे भेटायचे कशाला?
No comments:
Post a Comment