Thursday, November 12

आठवणी

धुक्यातून अचानक 
समोर आलेल्या वाटसरूप्रमाणे 
आठवणी ...
कुठूनतरी अचानक प्रकटतात !
दोन क्षण गप्पा मारून 
पुन्हा नाहीश्या होतात
एका गडद पडद्या-आड ...
तेच परिचित माणूस
पुन्हा कधी भेटेल 
हे सांगता येत नाही ना ?
तश्याच ....

1 comment:

rajendra chavan said...

शेवटच्या चार ओळी ..
आपण सहजच विसरतो हे ..
आपल्याला वाटतं ,
भेटीगाठी अशाच चालू राहणार आहेत !