मी पहिली-दुसरीत असेन ... आणि घरसुद्धा एकाच खोलीचं होतं ... पत्र्याच्या भिंती आणि कौलांचं छप्पर ...
जून महिन्यात गावाहून परत आल्यावर पहिला पाऊस यायचा तेव्हांची आठवण !
कौलांचं छप्पर कितीही साफ केलेलं असलं तरीही पाऊस त्यातून वाट शोधत घरात शिरायचाच !
मग धुणं वाळत घालायची काठी घेऊन जिथून गळतंय ती एक-दोन कौलं जरा जरा हलकेच ढोसायची म्हणजे गळायचं थांबत असे ... पण मी जर कधी एकटाच घरी असलो आणि पाऊस असा घुसखोरी करू लागला तर मी मात्र एक गम्मत करत असे
काठीने कौलं ढोसायची कल्पना मला पसंत नव्हती ... मी वेगवेगळी भांडी त्या गळ त्या धारांखाली ठेवून ही गम्मत करत असे
वेगवेगळी भांडी आणि गळणारे पाणी यांच्यातून ध्वनिंची एक मालिका तयार होत जायची ... आणि हा ऑर्केस्ट्रा मी पाऊस पडत राहील तोपर्यंत एन्जॉय करत राहायचो ... पाणी भरलं की आवाज कमी होत असे म्हणून मी एक बादली आणून त्यात जमा होणारे पाणी पटापट रिकामे करत असे ... म्हणजे पुन्हा ते भांडे आवाज करायला लागत असे ... प्लास्टिक, स्टील, एल्यूमिनियम अशी विविध भांडी वापरली की वेगवेगळी नोटेशंस तयार होत असत ...
खुपच मजा येत असे ...
पत्र्याचं घर गेलं ... आणि ती मजा ही गेली !
2 comments:
Nostalgia is sure a funny thing...at once makes you feel happy for the good things you have experienced and sad since they are now a thing of the past...
Phar surekh lihili aahes tuzi anubhav :)
Nostalgia is sure a funny thing...at once makes you feel happy for the good things you have experienced and sad since they are now a thing of the past...
Phar surekh lihila aahes tuzi anubhav :)
Post a Comment