सोशल इमेजचा भाग म्हणून
पॉलिटिक्सवर राग म्हणून
आलिया-गेलिया वर कॉमेंट म्हणून
होळी, दसरा- दिवाळी म्हणून
व्हॉट्सॅपाळावं लागतं
व्हॉट्सॅपाळण्यासाठी
व्हॉट्सॅप पाळावं लागतं
व्हॉट्सॅप लागतं
आपल्याला
व्हॉट्सॅप लागतं
सर्वांना
व्हॉट्सॅपाळलेले आपण सगळे
लागतो
व्हॉट्सॅपला
लागतो, बघतो, भोगतो,
जेवतोही, उठतोही,
बसतो, झोपतो, पादतोही
व्हॉट्सॅपाळतं
मग आपलं सर्व काही
संडासात, बिछान्यात, गाडीत, अॉफिसात
ढुंगणाच्या खिशात
व्हॉट्सॅप पिंगपुंग थरथरवत
इकडेतिकडे जातोयेतो जो तो
व्हॉट्स्फॅसाळलेल्या जगण्यासाठी
कम्युनिट्यांच्या गोत्रावळी
ग्रूपमधल्या फॉरवर्ड्सच्या
उष्ट्या पत्रावळी हपसत
बैन्डविड्थच्या आतड्यातून
पुढे सारून फॉरवर्डत
पचवत बसतो
करोडोंचं एकटेपण
व्हॉट्सॅपाळलेले करोडो
व्हॉट्सॅप व्हॉट्सॅप करत
पिंगलेलं जगणं रिचवतो
व्हॉट्सॅपच्या स्मायल्यांचे अर्थ शोधत
आणखी आणखी आणखी व्हॉट्सॅपाळतो !
व्हॉट्सॅप आणखी
लागतं
आपल्याला ....
व्हॉट्सॅप लागतं
आणखी
सर्वांना ....
व्हॉट्सॅपाळलेले
आणखी आपण
आणखी सगळे
आणखी आणखी
लागतो लागतो.
No comments:
Post a Comment