Friday, June 8

काळोख

तुझ्या भेटीसाठी
आतुर माझ्या मनामधे
मी भारून घेईन
असंख्य पावसाळ्यांमधून
आपल्यापर्यंत आजवर
इथवर वाहात आलेला
घनघन काळोख !
युगांतरीचा हा काळोख
भरला नसेल तर
एक साधी सर
कोसळत नाही असंच असतं पावसाचंही !  :)

No comments: