Wednesday, May 25

कविता इतस्ततः !काल रात्री 
माझ्या कविता इतस्ततः 
पसरून गेलं कोणीतरी ...
जिकडे तिकडे नुस्ती पाने
आणि विखुरलेल्या कविता
तुटक्या - फुटक्या ...
चुरगळलेल्या ...
मळलेल्या ...
विखुरलेल्या ...
आणि काही चक्क वाचलेल्या !
हे सर्व करणारे
कोण असेल कोण हे ?
पण जे कोणी असेल त्याची 
कमाल आहे ..
ज्या ज्या कवितेत तू आहेस ..
ती प्रत्येक कविता 
"वाचलेली" दिसते आहे !

No comments: