आज मी मरता कुणाचे काय जाईल ?
हाय अन माझी कुणाला आस राहिल ?
शोधुनी दु:खे मला पण थकुन जातील
खेळ त्यांचा रोजचा मग कोण साहिल ?
उत्तरे नाही अशी सगळीच कोडी ..
माग त्यांचा यातनामय काय राहिल ?
सांत्वनांचे हुंदके पुरतील का ?
या चितेवर आसवे मग कोण वाहिल ?
जन्म नावाचा उभा हा रोग होता ...
त्याच वाटेला पुन्हा का कोण जाईल ?
2 comments:
chhan...pan shevatachya oli
"जन्म नावाचा उभा हा रोग होता ...
त्याच वाटेला पुन्हा का कोण जाईल ?"
ekdam mast vatalya....keep it up...all the best for ur next creations....thnk u..
सुंदर कविता...फार हृदयस्पर्शी आहे
Post a Comment