Tuesday, March 16

प्रिय विंदा ...


प्रिय विंदा ...


मी लहान होतो तेव्हा ...
तुम्ही घेऊन आलात स्वप्नांचं एक जग
केवळ माझ्यासाठी !

जगातलं उत्तमोत्तम वेचून आणलेत माझ्यासाठी
आणि माझ्या कुमारबुद्धिला झेपेल, पचेल असे ते सर्व करून
त्याचे घास भरवलेत मला !


मी मोठा होत गेलो तसे
माझ्या हृदयात बसून
तुम्हीच कविता शिकवलीत मला !
प्रेम शिकवलेत, सौंदर्याचे पाठ गिरवून घेतलेत !


अजून मोठा झालो तेव्हा तर
मला मनात धूसर जाणवणारे सारेच
तुम्ही चपखल शब्दांत स्पष्ट म्हटलेत !


माझी भाषा,
माझे जगणे,
माझे बघणे,
सारे काही
हे असे तुमचेच !
तुम्ही घडवलेत !


इतक्या दुरूनही
कुणासाठी इतके बरेच काही करता येते ..
हे तुम्ही मला शिकवलेत !


तुम्ही माझे किंवा मी तुमचा कोण
कोणास ठावे ?
पण एक नक्की ..
आज माझ्या डोळ्यात
माझ्या बापासाठी आली होती
तीच आसवे !

3 comments:

संगमनाथ खराडे said...

i am speechless...Very Nice...

rajendra chavan said...

तुझे शब्द ,तुझा सूर ..
तुझा नूर और काही !

Ravindra Ravi said...

विंदांना चांगल्या शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे.