Tuesday, June 9

काटे

तू लावून गेलीस त्या या दारातल्या झाडाचं एक एक फूल ....
उमलताना एक एक पाकळी ...
उलगडत नेतं एक एक आठवण आपल्या नात्याची ....
बराच वेळ रमतो मी ..
त्या प्रत्येक पाकळीआडच्या दव-बिन्दुन्मधल्या अजब दुनियेत फिरत राहतो ...
मग येतो भानावर ...
जेव्हा येतं लक्षात की,
तू लावलेल्या या झाडाला काटेही आहेत !

1 comment:

आशा जोगळेकर said...

सुंदर . पण लक्षात यायला खरंच वेळ लागतो.
त्या वेळी आपले ही काटे जरा बोथट करावे कुणाला लागू नये म्हणून मग बोच जरा कमी होते आपलीही.