Wednesday, June 10

सहस्रचंद्रदर्शन

पी डी ए च्या नव्या पीढिच्या गेल्या तीन वर्ष चालू असलेल्या कामामधे सहस्रचंद्रदर्शन या दोन अंकी नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्णपणे नव्या जाणिवा घेऊन उभी राहिलेली पी डी ए ची नवी पीढी हे दोन अंकी नाटक समर्थपणे सादर करते ... या नाटकाविषयी सर्वकाही या इथे .... या ब्लॉग वर .... http://1000chandra.blogspot.com/

अवश्य भेट दया ... या 'सहस्रचंद्रदर्शन'च्या ब्लॉगला .....

Tuesday, June 9

काटे

तू लावून गेलीस त्या या दारातल्या झाडाचं एक एक फूल ....
उमलताना एक एक पाकळी ...
उलगडत नेतं एक एक आठवण आपल्या नात्याची ....
बराच वेळ रमतो मी ..
त्या प्रत्येक पाकळीआडच्या दव-बिन्दुन्मधल्या अजब दुनियेत फिरत राहतो ...
मग येतो भानावर ...
जेव्हा येतं लक्षात की,
तू लावलेल्या या झाडाला काटेही आहेत !